Suryakumar Yadav | विराट कोहलीने ठेवलेली स्टोरी पाहून सूर्यकुमारचा आनंद गगनात मावेना

Suryakumar Yadav – भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले आहे. त्याने वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या आवडत्या फॉरमॅट टी-२० मध्ये शतकीय खेळी केली. सूर्यकुमारने त्याच्या ३६० डिग्रीत खेळण्याच्या शैलीत श्रीलंकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पाहुण्या संघाचा कोणताही गोलंदाज त्याला अडचणीत आणू शकला नाही. त्याने ५१ चेंडूत ११२ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या याच खेळीच्या बळावर भारतीय संघाने सामन्यात आगोदर फलंदाजी करताना ५ गडी गमावून २२८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ अवघ्या १३७ धावांवरच सर्वबाद झाला.
“त्याने लहानपणी माझी बॅटिंग पहिली नाही…”, सूर्यकुमारच्या तुफानी खेळीवर द्रविड यांची प्रतिक्रिया
दरम्यान, सूर्यकुमारच्या दमदार खेळीचे अनेकांनी जोरदार कौतुक केले. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली यानेही सूर्यकुमारच्या तुफानी खेळीचे कौतुक केले. विराटने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर सूर्यकुमारचा फोटो ठेवला होता. महत्वाचं म्हणजे, विराटने ठेवलेली ही स्टोरी जेव्हा सूर्यकुमार यादव पाहतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते. सूर्यकुमारला त्या क्षणाला किती आनंद झाला होता हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav ) या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना चांगलेच अस्मान दाखवले. त्याने त्याच्या अस्सल फलंदाजी शैलीने गोलंदाजांची धुलाई केली. सामन्यात चेंडू थोडा जरी अंगावर किंवा पायाच्या दिशेने आला की, सूर्यकुमारने त्या चेंडूला सीमारेषेपार फाटकावले. त्याच्या खेळण्याच्या शैलीत दिवसेंदिवस सुधारणा दिसत आहे. कोणत्याही चेंडूला कुठेही टोलावण्याची कला त्याच्याकडे आहे. सध्या तो टी-२० प्रकारात जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याची सध्याची खेळण्याची लय पाहता तो पुढील बराच काळ आपले अव्वल स्थान राखेल असेच वाटते.
Suryakumar Yadav checking out Virat Kohli’s Instagram story. pic.twitter.com/rxzm565nlD
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 8, 2023
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारताच्या युवा सेनेने पाहुण्या श्रीलंकेला ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ने मात दिली. हार्दिकने त्याच्या नेतृत्वात भारताला सलग तिसरा मालिका विजय मिळवून देण्यात यश मिळवले आहे. श्रीलंकेला आता एकदिवसीय मालिकेत मात देण्यासाठी भारतीय संघ तयार आहे. दोन्ही संघांमध्ये १० जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होईल. यंदाच्या वर्षात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला पाहता भारतीय संघासाठी श्रीलंकेविरुद्धची मालिका पहिली पायरी असेल.





