Red 2 Tamannaah Bhatia | रेड चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाली असून या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर समोर आला आहे. यामधून रेड २ मध्ये असणाऱ्या कलाकारांची नावंही जाहीर झाली आहेत. या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्कंठा निर्माण केली आहे. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, तमन्ना भाटियाला रॅपर यो यो हनी सिंगसोबत हाय-एनर्जी डान्स ट्रॅकवर आयटंम सॅाग करणार असल्याची माहिती आहे. या गाण्याची कोरिओग्राफी विजय गांगुली हे करणार आहेत. या गाण्याचे शूटिंग मुंबईतील एका प्रसिद्ध स्टिडिओमध्ये केले जाणार आहे. यामुळे स्त्री २ नंतर तमान्ना रेड २ मध्ये आयटम सॅागवर थिरकताना दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण IRS अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत असणार आहे. यामुळे आता या चित्रपटातील तमन्नावर चित्रित होणाऱ्या गाण्याविषयी प्रेक्षक अत्यंत उत्सुक झाले आहेत. राज कुमार गुप्ता दिग्दर्शित आणि रितेश शाह, करण व्यास आणि जयदीप यादव यांच्या टीमने लिहिलेला रेड २ चित्रपटात अमेय पटनायक यांनी टाकलेल्या ७५ व्या धाडीवर आधारित असणार आहे. यावेळी छापा हा रितेश देशमुखने साकारलेल्या दादाभाई नावाच्या शक्तिशाली व्यक्तीच्या घरावर टाकण्यात येणार आहे. या चित्रपटात अजय आणि रितेश पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. याशिवाय चित्रपटात वाणी कपूर, रजत कपूर, सुप्रिया पाठक, अमित सियाल आणि यशपाल शर्मा यांच्याही भूमिका आहेत. सौरभ शुक्ला सीतागडचा भयानक डॉन तौजीची भूमिका पुन्हा साकारणार आहे.