Shraddha Kapoor : स्त्री २ नंतर अनेक मोठ्या अॅाफर्स आल्या पण…; श्रद्धा कपूरने दिलं मनं जिंकणार उत्तर
Shraddha Kapoor : या सत्रात तिने एका चाहत्याने विचारेल्या प्रश्नावर स्त्री २ च्या प्रचंड यशानंतर कोणताही चित्रपट का साइन केला नाही? याबद्दल सांगितले.

Shraddha Kapoor : बॅालिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या आगामी ईठा चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून ती एका दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह वाढला असून अलीकडेच तिने इंन्स्टाग्रामवरुन आस्क मी एनीथिंग या चाहत्यांसाठीच्या आयोजित सत्रात महत्वाचा खुलासा केला.
या सत्रात तिने एका चाहत्याने विचारेल्या प्रश्नावर स्त्री २ च्या प्रचंड यशानंतर कोणताही चित्रपट का साइन केला नाही? याबद्दल सांगितले. श्रद्धा म्हणाली “स्त्री २ नंतर मला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. मला खूप चांगले मानधनही देऊ केले होते. पण मी ठरवले होते की, जोपर्यंत मला माझ्या आवडीची योग्य कथा मिळत नाही, तोपर्यंत मी कोणताही चित्रपट साइन करणार नाही.”
ती पुढे म्हणाली, “अर्थात आपल्याला खरोखर हव्या असलेल्या गोष्टीसाठी वाट पाहणे कठीण असते. पण आज मला याचा अभिमान आहे की मी वाट पाहण्याचा निर्णय घेतला. तुमच्या हृदयातील त्या लहान आवाजाचे ऐका. कधीकधी ते कठीण असते, पण त्याचा परिणाम खूप चांगला असतो.” असा सल्लाही तिने दिला.
या दिवशी ईठा प्रेक्षकांच्या भेटीला येणार
३० ऑक्टोबर रोजी श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात श्रद्धा कपूर लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तर अभिनेता रणदीप हुड्डा देखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला असून आता हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याने त्याला कसा प्रतिसाद प्रेक्षकांचा लाभतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.






