पुस्तक वाचल्यावर उद्धव ठाकरेंची थेट एकाच वाक्यात प्रतिक्रिया म्हणाले…

Uddhav Thackeray : खासदार संजय राऊत हे त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात करण्यात आलेल्या खळबळजनक दाव्यांमुळे चर्चेत आहेत. काल मुंबईतील प्रभादेवीतील रवींद्र नाट्यगृहात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कार्यक्रम पार पडला. या पुस्तकाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी तब्बल १०० दिवस तुरुंगवास भोगला असून या शंभर दिवसांत आलेल्या अनुभवावर नरकातला स्वर्ग हे पुस्तक आहे. या पुस्तकावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरा झडू लागल्या आहेत. तसेच पुस्तकावरून राज्याचे राजकारण देखील चांगलचे तापले आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी नरकातला स्वर्ग पुस्तक वाचताच दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
पुस्तकाचे संपूर्ण काम झाल्यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचण्यासाठी दिले होते. त्यावेळी पुस्तकाबाबत प्रकाशन सोहळ्यावेळी सांगणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना सांगितले होते. पुस्तक कसे वाटले याची प्रतिक्रिया उद्धव यांनी दिली. ‘यामध्ये कसलेच रडगाणे नाही’ अशी एकाच वाक्यात त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया अत्यंत बोलकी असून, ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा हा किस्सा संजय राऊत यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी सांगितला.
केंद्र सरकार टीका
हे सरकारही उद्या जाणार आहे. ज्यांनी आपल्या स्वर्गासारख्या देशाला नरक करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना नरकात टाकण्यासाठी आपल्याला लढावं लागेल. टाका त्यांच्यावर धाडी.. बसवा त्यांना सुद्धा जेलमध्ये.. असे म्हणत ठाकरे यांनी केंद्र सहकारवर घणाघाती टीका केली आहे.





