“फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा..” अजित पवारांकडे राष्ट्रवादी गेल्यानंतर रोहित पवारांनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – शिवसेना पक्षापाठोपाठ केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंधर्भात अनपेक्षित निकाल देताना शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का देताना अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे देण्याचा पर्याय देण्यास सांगितले आहे. त्यासाठी शरद पवार यांना ७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजेची वेळ देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे! अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी आणि पक्ष चिन्ह अजित पवारांकडे सुपूर्त केल्यानंतर रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणतात,”केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो. परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्यावर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते”
रोहित पवार पुढे म्हणतात,”आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे” लडेंगे और जितेंगे हा हॅशटॅग देखील यावेळी रोहित पवार यांनी वापरला आहे.
केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो.… परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना… pic.twitter.com/qAAn2BZZBF
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 6, 2024
निवडणूक आयोगाने काय म्हटले?
अजित पवाराकंडील पक्ष खरा पक्ष आहे
पक्ष आणि चिन्ह अजित पवार वापरतील
दोन खासदार अजित पवार गटाच्या बाजूने
५ आमदारांनी दोन्ही बाजूंनी पत्र दिले
उद्या ७ फेब्रुवारीपर्यंत पक्षाचे नाव आणि चिन्ह सूचवावे
पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नाहीत





