“मुलाचे नाव तैमुर ठेवल्यावरुन…”; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला संशय

Jitendra Avhad on Saif Ali Khan Attack | बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात घुसून एका चोराने त्याच्यावर चाकू हल्ला केला आहे. त्याच्यावर तब्बल सहा वार करण्यात आले असून यातील दोन घाव गंभीर असल्याचे म्हंटले जात आहे. या घटनेनंतर त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवरुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी राज्य सरकारला घेरले आहे.
यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सैफवर झालेला हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो, असा संशय व्यक्त केला आहे. तसेच सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यामागे धार्मिक कट्टरतावादी आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या सर्व प्रकारावर आव्हाडांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. Jitendra Avhad on Saif Ali Khan Attack |
सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो.गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव *#तैमुर* ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते.ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे ? या दिशेने ही तपास होणे… pic.twitter.com/9atYhziAtl
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 16, 2025
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड यांनी ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत लिहिले की, “सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव ‘तैमुर’ ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे. कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे.” Jitendra Avhad on Saif Ali Khan Attack |
“त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे समजते. एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे .त्यामुळे त्यांच्या मनक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता, वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सैफ अली खान हे भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणार्या पद्श्री पुरस्काराने सन्मानित आहे. हे विशेष !”, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. Jitendra Avhad on Saif Ali Khan Attack |
महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघाले – वर्षा गायकवाड
तर मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनीही या प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. “महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत, हा प्रश्न मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी स्वतःला विचारायला नको का? गुन्हेगारांची पाठ थोपटतंय तरी कोण? कोणाचं पाठबळ मिळतंय यांना की, कायद्याचा जरा ही धाक राहिलेला नाही? महाराष्ट्रात जे घडत आहे, ते अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे,” असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. Jitendra Avhad on Saif Ali Khan Attack |
हेही वाचा:
महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे पहिल्यांदाच दिसणार एकत्र; ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित





