kareena kapoor : बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोड्यांपैकी एक म्हणजे करीना कपूर खान आणि सैफ अली खान. अलीकडेच करीना कपूरने आपल्या सोशल मीडिया हँडलवर पती सैफसाठी एक खास आणि मनापासून लिहिलेलं लेटर शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. करीनाचे लेटर करीनाने इंस्टाग्राम स्टोरीवर सैफसाठी काही भावनिक, तर काही मजेशीर ओळी लिहिल्या. तिने लिहिले, “हाय सैफ, मी फक्त एक आई आहे जी आपल्या नवऱ्यासमोर उभी आहे आणि काहीतरी बोलू इच्छिते. पण आता आठवत नाही काय बोलणार होते, कारण आपल्या मुलांनी आपल्याला 175 वेळा थांबवले आहे.” या विनोदी आणि प्रेमळ संदेशामुळे चाहत्यांमध्येही हसू पसरले. करीना-सैफची प्रेमकहाणी आणि लग्न करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी 16 ऑक्टोबर 2012 रोजी कोर्ट मॅरेज केल. त्यानंतर एका भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले. लग्नापूर्वी दोघे जवळपास पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. या दाम्पत्याला तैमूर आणि जेह असे दोन मुले आहेत. करीनाचा वर्कफ्रंट करीना लवकरच मेघना गुलजार दिग्दर्शित आगामी थ्रिलर-ड्रामा ‘दायरा’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहे. ‘दायरा’ हा अपराध, शिक्षा आणि न्याय यांच्या संघर्षावर आधारित चित्रपट असून समाजातील गुंतागुंतीच्या वास्तवावर प्रकाश टाकतो.