Varun Dhawan : बॅालिवूड सिनेमा इंडस्ट्रीत हिस्ट्री निर्माण करणाऱ्या बॅार्डर सिनेमानंतर त्याचा सिक्वल अर्थात बॅार्डर २ येत्या नव्या वर्षात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बॅार्डर २ ची जोरदार चर्चा आहे. या सिनेमाची अपडेट वेळावेळी येत असून, आता सिनेमातील अभिनेता वरूण धवणचा लुक समोर आला आहे. सिनेमाच्या पहिल्याच पोस्टरमध्ये वरूण धवण दमदार लुकमध्ये दिसत असून त्याने लष्करी गणवेश परिधान केला आहे. पोस्टरमध्ये त्याच्या हातात बंदुक असून चेहऱ्यावर राग आहे, तर डोळ्यात अंगार दिसत आहे. त्याच्या या दमदार लुकची चाहते सोशल मीडियावर प्रशंसा करताना दिसत आहे. हे बॅार्डर २ चे पहिलेच पोस्टर असून या पोस्टरमध्ये बॅार्डर उसका फर्ज है और भारत उसका प्यार असे कॅप्शन दिले आहे. या सिनेमातील लुक वरूणच्या आत्तापर्यंतच्या सर्वच लुकपेक्षा वेगळा आहे. सिनेमातील त्याला मिळालेली भूमिका देखील विशेष असणार असे बोलले जात आहे. यामुळेच बॅार्डर २ सिनेमा वरुण धवनच्या करिअरला कलाटणी देणारा सिनेमा ठरू शकतो अशी चर्चा सुरू आहे. पोस्टर पाहिल्यानंतर एका युजरने म्हटले की, १०० कोटी रुपये कमाई करणारा सिनेमा येत आहे. View this post on Instagram A post shared by tseriesfilms (@tseriesfilms) ‘बॉर्डर २’ चे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले असून, हा सिनेमा २३ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा उद्देश केवळ मनोरंजन नाही तर भारतीय सैनिकांच्या धैर्याला, बलिदानाला आणि देशभक्तीला आदरांजली वाहणे असणार आहे. सिनेमाची निर्मिती भूषण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांसारख्या प्रसिद्ध निर्मात्यांनी केली आहे. स्टारकास्टबद्दल बोलायचे झाल्यास सनी देओल आणि वरुण धवन व्यतिरिक्त दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, मेधा राणा, मोना सिंग आणि सोनम बाजवा हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हेही वाचा : चीनची मोठी घोषणा ! अमेरिकन वस्तूंवरील शुल्क २४ टक्क्यांनी कमीकरण्याची घोषणा