जान्हवीने रडून माफी मागितल्यावर विशाखा सुभेदारने सुनावलं…

Bigg Boss Marathi । बिग बॉस मराठीच्या पाचवा सीझन चांगलाच चर्चेत आला आहे. या सिझनमध्ये सतत वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतायच नुकत्याच झालेल्या सीजनमध्ये निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेदार इतर स्पर्धकांना चुकीच्या पद्धतीने बोलताना दिसत आहे.
निक्की आणि जान्हवीने भांडणात दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि अभिनेते पंढरीनाथ कांबळे (पॅडी) यांचा अपमान करतांना दिसल्या. यावरून आता सोशल मीडियावर या दोघीही चांगल्याच ट्रोल होतांना दिसत आहे.
नुकत्याच झालेल्या सिझनमध्ये जान्हवीने पंढरीनाथ (पॅडी) कांबळेचा अपमान करत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. पॅडी कांबळेचा बिग बॉसच्या घरात जान्हवीने ‘जोकर’ म्हणून उल्लेख केला. यावरून आता अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्यासह अनेकांनी पॅडीदादा यांना पाठींबा देत जान्हवीची चांगलीच शाळा घेतली आहे.
विशाखा सुभेदार यांनी पोस्ट लिहिले आहे की…
”माफ केलं तुला असं नाही म्हणालाय तो…पण, मनाचा मोठेपणा मात्र दाखवलायं. Its Ok. म्हणजे ठीक आहे असं म्हणालाय… Actor आहे तो, आम्ही रोज हे भाव भावनांचं विश्व घेऊन हिंडतो. पाठमोरा माणूस सुद्धा काय म्हणतं असेल हे कळू शकतं आम्हाला, कारण तोच तर आमचा धंदा आहे…! त्या अनुभवी माणसाला अश्रू खरे- खोटे कळले नसतील? तरीही तुझ्या खोट्या अश्रूंना तो Its Ok म्हणाला.. कारण, तो खरंच बापमाणूस आहे…!
त्याने दिला असेल विषय सोडून पण बाई आता तरी जिभेला आवर घाल. More power to Paddy Kamble.
लढ बापू #aplapaddy #संयमकायम #actor
काल काय झालं…बाहेरच्या जगात सुद्धा मी तुझं रक्षण करेन… असं रक्षाबंधन साजरं झालं.. शॉपिंग झाली, माफी मागणं ही नौटंकी झाली, कॅप्टन बदलला आणि तेच जास्त बोलले… Mike वरून.”
View this post on Instagram
दरम्यान, जान्हवीने माफी मागितल्यावर पंढरीनाथने देखील तिला मोठ्या मनाने माफ करत यापुढे असं वैयक्तिक भाष्य करू नकोस असा सल्ला दिला आहे. आता यापुढे जान्हवी घरात कशी वागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






