Yugendra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा दोन महिन्यांपूर्वी मोठ्या थाट्यात लग्न समांरभ पार पडला. त्यांच्या साखरपुड्याची गोड बातमी सर्वप्रथम खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्टसह फोटो शेअर करत दिली होती. त्यानंतर आता युगेंद्र पवार हे देखील लवकरच विवाहबंधनात अडणार असून, त्यांचा देखील साखरपुडा ठरला असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या फेसबुकवर पोस्ट शेअर करत दिली आहे. युगेंद्र पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव तनिष्का प्रभू असून तिने परदेशातून फायनान्सचे शिक्षण घेतले आहे. ती मूळचे मुंबईची आहे. नुकताच दोघांचा घरगुती पद्धतीने साखरपुडा पार पडला आहे. या दोघांचे साखरपुडा झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर फेसबुकवर दोघांचे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसाला शरद पवार यांनी अक्षता टाकायची संधी कधी देताय? अशी विचारणा केली होती. हा आजोबांंचा सल्ला युगेंद्र पवार यांनी मनावर थेट साखरपुड्याची बातमी दिली आहे. हेही वाचा : माझं ठरलं होतं की, घर बांधल्याशिवाय लग्न…..; अजित पवारांनी सांगितला लग्नाआधीचा ‘तो’ किस्सा