अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका मिस्ट्री मॅनसोबत झाली स्पॉट

Malaika Arora | बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिच्या कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चा रंगत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अर्जुनने स्वत:ला सिंगल घोषित केले होते. या सगळ्यादरम्यान मलायका आता एका मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये मलायकाने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि ब्राउन रंगाची पँट घातली आहे. यात मिस्ट्री मॅन मलायकाचा हात धरुन चालताना दिसत आहे. डिनर डेट दरम्यान दोघांना स्पॉट करण्यात आले आहे. मलयाका सोबत दिसणारा मिस्ट्री मॅन कोण आहे याबद्दल अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही. परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी तिच्यावर टीकाही करत आहेत.
View this post on Instagram
‘मलायकाला दुसरा कोणीतरी भेटला वाटतं’, ‘आता हा कोण?’, ‘दुसऱ्या पुरुषावर प्रेम झालं आहे,’ अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. सध्या सर्वत्र मलायका सोबत दिसणाऱ्या मिस्ट्री मॅनची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले होते. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2019 मध्ये मलायका आणि अर्जुन यांनी आपल्या नात्याचा स्वीकार केला. गेल्या 8 वर्षांपासून मलायका-अर्जुन एकत्र होते. परंतु आता दोघांचे ब्रेकअप झाले आहे.
अभिनेत्री मलायकाला छैय्या छैय्या या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मलायका ही फॅशन शोचे परीक्षण करते. तर अभिनेता अर्जुनने ‘इश्कजादे’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अर्जुनच्या गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
हेही वाचा:
अनिल देशमुखांवरील हल्ल्याबाबत संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप ; म्हणाले,”हा हल्ला…”





