Buldhana News : केस गळतीनंतर बुलढाण्यात झाली नव्या आजाराची एन्ट्री

बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून बुलढाण्यातील शेगाव तालुक्यात टक्कल व्हायरसने धुमाकूळ घातल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. शेगावसह आसपासच्या गावातील अनेक लोकांची केसगळती झाली होती. यानंतर हा आजार काही प्रमाणात आटोक्यात आल्याचे समजत आहे. ज्या लोकांचे केस गळाले त्यांना पुन्हा केस येऊ लागले आहे. हा आजार कमी होतो ना होतो आता बुलढाण्यात नव्या आजाराने एंट्री केली आहे.
काय आहे हा आजार?
बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट हाती लागली आहे. केस गळतीचे नेमके कारण अद्याप शोधण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलं नाही, अशातच आता केस गळती झालेल्या नागरिकांची दृष्टी कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. या केस गळतीमुळे तर या लोकांच्या दृष्टीवर परिणाम झाला नाही ना? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
केस गळती झालेल्या रुग्णांची दृष्टी कमी होण्यामागं नेमकं काय कारण आहे, याची अधिकृत माहिती समोर आली नाही. पण आरोग्य यंत्रणेने केस गळतीचे नेमके कारण शोधून काढावं. तसेच केस गळतीच्या रुग्णांना सुरू झालेल्या दृष्टी दोषावर लवकरात लवकर उपचार करावेत, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.





