मुंबई – मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. ‘एसआरए’प्रकरणी मुंबईतील वांद्रे येथिल निर्मल नगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा नोंद झाला आहे. गोमाता एसआरए प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांच्यावर याबाबत आरोप देखील झाले होते. पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल होताच राजकीय वर्तुळातील हालचालींना वेगळं आल्याचे दिसून आले. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी पेडणेकर यांनी यावरून टोला लगावला आहे.
किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त येताच शीतल म्हात्रे यांनी याबाबतची एक न्यूज शेअर करत “कचोरी ताई… आता काय करणार ?” असा खोचक सवाल उपस्थित केला आहे. किशोरी पेडणेकर याला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत झालेल्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबई महापालिकेकडून कारवाईही झाली होती.
मुंबई पोलीस निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर कुटुंब आणि किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध गोमाता जनता एसआरए वरळी मुंबई येथे फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केली होती.
मुंबई पोलीस निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर कुटुंब आणि किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध गोमाता जनता एसआरए वरळी मुंबई येथे फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. @BJP4Maharashtra pic.twitter.com/eD2XZLQoUj
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 14, 2023