आधी म्हणाल्या ‘लठ्ठ’, आता केले कौतुक; भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचा उल्लेख करत शमा मोहम्मद म्हणाल्या…

India Won Champions Trophy | चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर आता देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला लठ्ठ म्हणणाऱ्या काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद या काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला लठ्ठ म्हटले होते. आता भारताच्या विजयानंतर त्यांनी संघ व रोहितचे कौतुक करणारे ट्विट केले आहे.
भारतीय संघाच्या विजयानंतर शमा मोहम्मद ट्विट करत म्हणाल्या की, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाचे अभिनंदन. कर्णधार रोहित शर्माला सलाम, त्याने शानदार 76 धावांची खेळी करून पाया रचला. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी भारताला विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. एक अविस्मरणीय विजय!
Congratulations to #TeamIndia for their stupendous performance in winning the #ChampionsTrophy2025! 🇮🇳🏆
Hats off to Captain @ImRo45 who led from the front with a brilliant 76, setting the tone for victory. @ShreyasIyer15 and @klrahul played crucial knocks, steering India to…
— Dr. Shama Mohamed (@drshamamohd) March 9, 2025
शमा मोहम्मद यांचे रोहित शर्माचे कौतुक करणारे ट्विट व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी रोहितच्या फिटनेसवर भाष्य केले होते. त्यानंतर आता विजयानंतर कौतुक केल्याने याची चर्चा रंगली आहे.
काय म्हणाल्या होत्या शमा मोहम्मद?
रोहित शर्मा एक खेळाडू म्हणून खूप लठ्ठ आहे. त्याला वजन कमी करण्याची गरज असून तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात वाईट कर्णधार आहे., अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते. यावरून बराच वाद रंगला होता.
𝐑𝐨𝐡𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐦𝐚’𝐬 𝐛𝐞𝐟𝐢𝐭𝐭𝐢𝐧𝐠 𝐚𝐧𝐬𝐰𝐞𝐫 𝐭𝐨 𝐂𝐨𝐧𝐠𝐫𝐞𝐬𝐬!#ChampionsTrophy2025 #RohitSharma pic.twitter.com/CzclJlb8VF
— BJP (@BJP4India) March 9, 2025
आता भारताच्या विजयानंतर भाजपने देखील काँग्रेसवर निशाणा साधत खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटमध्ये भाजपने कर्णधार रोहित शर्माचा एक फोटो शेअर केला असून यामध्ये “अनफिट समझा क्या? सुपरफिट है मैं! असं लिहिले आहे.





