फडणवीसांनंतर शिंदेंचा अजित पवारांना सल्ला, मलिकांबद्दल काय बोलले?

Nawab Malik case – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले असून विधानसभा सभागृहात ते सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेता येणार नाही, असे स्पष्ट केल्यानंतर आता नवाब मलिकांबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपली स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत. सध्या केवळ प्रकृतीच्या कारणावरून ते जामिनावर तुरुंगातून बाहेर आहेत. त्यांना कोर्टाने अद्याप निर्दोष ठरविलेले नाही. त्यामुळे त्यांच्याविषयीची आमची पूर्वीची भूमिका अजूनही कायम आहे.”
ते पुढे म्हणाले,’माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत. सध्या केवळ प्रकृतीच्या कारणावरून ते जामिनावर तुरुंगातून बाहेर आहेत. त्यांना कोर्टाने अद्याप निर्दोष ठरविलेले नाही. त्यामुळे, त्यांच्याविषयीची आमची पूर्वीची भूमिका अजूनही कायम आहे. सत्ताधारी पक्षांच्या बाकावरील त्यांची उपस्थिती संकेतांना धरुन नाही’ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.





