पिंपरीत तलवार, कोयत्याने टोळक्‍याकडून लूटमार आणि तोडफोड; घटना सीसीटीव्हीत कैद

Updated On:
पिंपरीत तलवार, कोयत्याने टोळक्‍याकडून लूटमार आणि तोडफोड; घटना सीसीटीव्हीत कैद

पिंपरी (प्रतिनिधी) – चप्पल खरेदी केल्यानंतर पैसे मागितल्याच्या रागातून चप्पल विक्रेत्यावर तलवारीने वार केले. तसेच दुकान आणि वाहनांवर दहा जणांच्या टोळक्‍याने दगडफेक करीत दहशत निर्माण केली. ही घटना गुरुवारी (दि. 24) रात्री सव्वा आठच्या सुमारास जमतानी चौक, पिंपरी कॅम्प येथे घडली. वाढत्या घटनांमुळे शहरातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

गणेश परशुराम परब (रा. पिंपरी) असे जखमी झालेल्या चप्पल विक्रेत्याचे नाव आहे. त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, किरण प्रकाश डोंगरे, सिद्धार्थ गायकवाड, संतोष पवार (सर्व रा. मिलिंदनगर, पिंपरी) यांच्यासह अन्य सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवारी रात्री आरोपी त्यांच्या दुकानातून पैसे न देता जबरदस्तीने बूट व चप्पल घेऊन जात होते. त्या वेळी फिर्यादी यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यामुळे चिडलेला आरोपी संतोष पवार याने आम्ही पिंपरीतील भाई आहोत, तुला माहिती नाही का, बूट खरेदीचे पैसे मागतो काय” असे म्हणून फिर्यादी यांच्या दंडावर तलवारीने वार केला.

त्यानंतर आरोपींनी आपसात संगनमत करून दुकानातील 18 बूट व चप्पल असा बारा हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. तसेच, जाताना दुकान आणि वाहनांवर दगडफेक करीत नुकसान केले. आरोपींचा भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी सुरू असलेला हा धुडगूस पाहून परिसरातील व्यापाऱ्यांनी भीतीपोटी आपल्या दुकानांचे शटर खाली ओढले. दरम्यान, या घटनेमुळे कॅम्प परिसरातील व्यापारी दहशतीखाली आले असून, आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

कॅम्प परिसरात टोळक्‍याने धुडगूस घातल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना तत्काळ आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

2026-10-07 11:15:40

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

दिव्यांगांचे अनुदान सहा हजार करा; महागाईच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांची मागणी

2026-10-07 08:39:47

दिव्यांगांचे अनुदान सहा हजार करा; महागाईच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांची मागणी

Pimpri : मध्यस्थीतून जुळले संसाराचे धागे; दोन मुलांसाठी पती-पत्नीचा सामोपचार

2026-10-07 08:02:22

Pimpri : मध्यस्थीतून जुळले संसाराचे धागे; दोन मुलांसाठी पती-पत्नीचा सामोपचार

SIR 2026: आम्‍हाला ते मतदानच नको...नागरिकांचा संताप

2026-10-07 07:56:08

SIR 2026: आम्‍हाला ते मतदानच नको...नागरिकांचा संताप

Pimpri school : शाळांसमोर विद्यार्थ्यांचा रोज जीव मुठीत; भरधाव वाहतुकीचा धोका

2026-10-07 07:40:38

Pimpri school : शाळांसमोर विद्यार्थ्यांचा रोज जीव मुठीत; भरधाव वाहतुकीचा धोका