बादशाहने माफी मागितल्यानंतर हनी सिंगने दिली पहिल्यादाच ‘प्रतिक्रिया’

भारतीय रॅपर बादशाह आणि हनी सिंग यांच्यात 15 वर्षांपासून लढत सुरू होती. दोघंही अनेकदा आपापल्या मैफिलीत कोणाचंही नाव न घेता एकमेकांना काहीतरी बोलतांना दिसले. नुकतेच बादशाहने हे 15 वर्षे जुने वैर संपवण्याचा निर्णय घेतला. त्याने हनी सिंगची जाहीर माफी मागितली. बादशाहच्या माफीनंतर हनी सिंगने आता प्रतिक्रिया दिली आहे. या दोघांनी प्रसिद्ध रॅप ग्रुप मुंदिर सोडल्यानंतर बादशाह आणि हनी सिंग यांच्यात भांडण सुरू झाले.
बादशाह आणि हनी यांच्यातील वैर हे भारतीय संगीत उद्योगातील सर्वात मोठे शत्रुत्व असल्याचे म्हटले जाते. हनी सिंगने आता एका मुलाखतीत बादशाहच्या माफीवर प्रतिक्रिया दिली आहे. मुलाखतीत हनी या भांडणांबाबत म्हणाला,’त्याच्याबद्दल काय बोलू?’
‘तो काय बोलतोय ते मला समजत नाहीये. मी कधी कोणाबद्दल काही बोललो आहे का ? मारामारी झाली असे लोक म्हणत आहेत. मला समजत नाही की लोक हनी सिंग-बादशाहच्या भांडणावर का बोलतात. एक व्यक्ती इतकी वर्षे माझ्याबद्दल बोलत राहिली आणि मग एक दिवस त्याने माफी मागितली. त्याबद्दल मी काय बोलू? माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. माझा त्यांच्यावर विश्वासही नाही. तो माझा मित्र कधीच नव्हता. जर तो माझा मित्र असता आणि काहीतरी घडले असते तर गोष्ट वेगळी असती. मी तो व्हिडिओ पाहिला नाही, पण त्याने आमच्यातील गैरसमजांचा उल्लेख केल्याचे ऐकले. माझ्याबद्दल त्यांचे स्वतःचे विचार आणि मते होती. अनेक वर्षांनी त्याला हे कळले, ही चांगली गोष्ट आहे.





