‘ॲनिमल’नंतर आता ‘कांगुवा’ चित्रपटातील बॉबी देओलचा खतरनाक अवतार

Kanguva Film | ‘ॲनिमल’ चित्रपटातून आपला धबधबा निर्माण करणारा अभिनेता बॉबी देओलने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटात बॉबीची भूमिका खलनायकाची होती. यातील त्याच्या भूमिकेला मोठी लोकप्रियता मिळाली. आता बॉबी देओल साउथ चित्रपट ‘कांगुवा’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
या चित्रपटाच्या पहिल्या दिवसासाठी मोठी ॲडव्हान्स बुकिंग झाली होती. बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यासाठी आता हा चित्रपट 14 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सूर्याने मुख्य भूमिका साकारली आहे. ‘कांगुवा’ला रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल झाला आहे. यासोबतच सूर्या आणि बॉबी देओलच्या चित्रपटाची कथा, स्टार कास्ट आणि व्हीएफएक्सचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.
त्याचवेळी, या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची माहिती समोर आली आहे. प्राइम व्हिडिओने ‘कांगुवा’चे ओटीटी हक्क 100 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अंदाजे पोंगलच्या मुहूर्तावर ‘कांगुवा’ डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जाईल, कारण चित्रपटाच्या थिएटरमध्ये रिलीजच्या 8 आठवड्यांनंतर OTT रिलीजसाठी साइन केले गेले आहे. प्राइम व्हिडिओने X खात्यावर चित्रपटाच्या ओटीटी रिलीज तपशीलासंबंधी पोस्टर देखील शेअर केले आहे. Kanguva Film |
कांगुवा’मध्ये बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकारली असून हा त्याचा पहिला तमिळ चित्रपट आहे. दिशा पटानीने या चित्रपटात सूर्याच्या प्रेमिकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाद्वारे दिशाने तमिळ चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे.
हेही वाचा :
“हे संविधान रिकामे नाही, ते वाचले नाही म्हणून…”; राहुल गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल





