निराशजनक कामगिरीनंतर वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ चित्रपट पाहता येणार ओटीटीवर

Baby John OTT Release | बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा ‘बेबी जॉन’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. या चित्रपटाच्या प्रमोशन जोरदार करण्यात आले होते, मात्र वरुणचा हा चित्रपट प्रेक्षकांची पसंतीस पडला नाही. 25 डिसेंबर रोजी चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली. मात्र त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत घसरण होताना पाहायला मिळाली आहे.
‘बेबी जॉन’ चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची कामगिरी निराशाजनक आहे. तर ‘पुष्पा 2’ आणि हॉलिवूड चित्रपट ‘मुफासा द किंग’चा ‘बेबी जॉन’ चित्रपटाला मोठा फटका बसला आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज होणार आहे.
‘बेबी जॉन’ हा वरुण धवनचा ॲक्शन ड्रामा चित्रपट ॲमेझॉन प्राइमवर पाहता येणार आहे. या चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स ॲमेझॉन प्राइमने खरेदी केले आहेत. मात्र अजूनही ओटीटी रिलीज डेट अधिकृतरित्या जाहीर झाली नाही.
‘बेबी जॉन’ चित्रपटाची कमाई किती ?
180 कोटींमध्ये तयार झालेल्या ‘बेबी जॉन’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी 11.25 कोटी रुपयांचे खाते उघडले होते. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 4.75 कोटी रुपयांची कमाई केली. तर रिलीजच्या 10 व्या दिवशी 45 लाखांची कमाई केली आहे. यासोबतच ‘बेबी जॉन’चे 10 दिवसांचे एकूण कलेक्शन आता 36.85 कोटी रुपये झाले आहे.
‘बेबी जॉन’ चित्रपट साऊथ सुपरस्टार थलपथी विजयच्या ‘थेरी’चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती. तर’बेबी जॉन’ चित्रपटात वरुण धवन सोबतच कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ, राजपाल यादव आणि सान्या मल्होत्रा पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा :





