नवीन ‘स्वीफ्ट’ला बाजारात मोठी मागणी, दर महिन्याला विकतात ‘इतक्या’ हजार कार

नवी दिल्ली – भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने भारतीय बाजारपेठेत अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. कंपनी दर महिन्याला लाखो युनिट्सची विक्री करते, ज्यामध्ये सीएनजी वाहनांचा महत्त्वाचा वाटा आहे. यासोबतच मे महिन्यात लॉन्च करण्यात आलेल्या नवीन जनरेशन स्विफ्टलाही ग्राहक पसंती देत आहेत.
सीएनजी कारची 33 टक्के विक्री –
मारुती सुझुकी इंडियाचे मार्केटिंग आणि सेल्सचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी यांनी माहिती दिली की या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत CNG कारने विक्रीत 33 टक्के योगदान दिले आहे. सीएनजी कारची मागणी सातत्याने वाढत आहे आणि त्यासाठी कंपनी सातत्याने उत्पादन वाढवत आहे.
सीएनजी कारचा वाटा वाढेल –
मारुती सुझुकीचे एसईओ पार्थो बॅनर्जी यांना अपेक्षा आहे की या दशकाच्या अखेरीस कंपनीच्या लाइनअपमध्ये सीएनजी वाहनांचा वाटा 35 टक्के असेल. गेल्या आर्थिक वर्षात मारुतीने सुमारे 4.50 लाख सीएनजी वाहनांची विक्री केली आहे, या आर्थिक वर्षात कंपनीला सहा लाखांहून अधिक सीएनजी वाहनांची विक्री होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने मध्यम आकाराच्या SUV Grand Vitara च्या CNG प्रकारातील 7671 युनिट्स विकल्या आहेत.
14 मॉडेल्समध्ये सीएनजी उपलब्ध –
मारुती सीएनजी कार मार्केटमध्ये जास्तीत जास्त मॉडेल्स ऑफर करते. Alto K10, S-Presso, Wagon R, Celerio, Dzire, Brezza, Ertiga, Eeco, Baleno, XL6, Fronx, Grand Vitara यासह मारुती एकूण 14 मॉडेल्समध्ये CNG ऑफर करते.
अधिक परवडणाऱ्या नवीन स्विफ्टला बाजारात मोठी मागणी –
नवीन जनरेशन मारुती स्विफ्ट 2024 मारुतीने 9 मे 2024 रोजी बाजारात 6.49 लाख रुपये लाँच केली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन जनरेशनची स्विफ्ट जुन्या माॉडेलच्या तुलनेत चांगले मायलेज देते. नवीन स्विफ्ट अधिक किफायतशीर असल्याने त्याची मागणीही वाढत आहे. लॉन्च झाल्यापासून, या हॅचबॅक कारचे सुमारे 54550 युनिट्स विकले गेले आहेत आणि दर महिन्याला सरासरी 18 हजाराहून अधिक स्विफ्ट विकल्या जात आहेत.



