Maruti Suzukiची नवी स्विफ्ट कार क्रॅश टेस्टमध्ये झाली ‘पास’, सुरक्षेसाठी मिळाले 4 स्टार रेटिंग, मे महिन्यात होणार लाॅंच

Maruti Suzuki New Swift: सध्या भारतात नवीन स्विफ्टची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. मारुती सुझुकी आपली नवीन जनरेशन स्विफ्ट मे 2024 मध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. स्विफ्टचे नवीन मॉडेल यापूर्वीच युरोप आणि इतर जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असून आता ते भारतात येण्याची प्रतीक्षा आहे. नवीन सुझुकी स्विफ्टची भारतात लॉन्च होण्यापूर्वी जपानमध्ये क्रॅश चाचणी घेण्यात आली आहे. सुझुकी स्विफ्टने क्रॅश चाचण्यांमध्ये 99% गुणांसह 4 स्टार सुरक्षा प्राप्त केली आहे.
परंतु भारतासाठी 2024 मारुती स्विफ्ट आवृत्तीसाठी सुरक्षा रेटिंग समान असू शकत नाहीत. पण नवी स्विफ्ट भारतासाठी कशी बनवली जाईल आणि त्यात कोणते फिचर्स असतील हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. इंटरनॅशनल स्पेक मॉडेल भारतातही आणले तर बरे होईल.

नवीन स्विफ्ट 9 मे रोजी लॉन्च होणार –
रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकीची नवीन स्विफ्ट यावर्षी 9 मे रोजी लॉन्च होऊ शकते. भारतात चाचणी दरम्यान हे अनेक वेळा पाहिले गेले आहे. यामध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत. यामध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन फीचर्सचा समावेश करण्यात येणार आहे.
यावेळी नवीन स्विफ्टच्या डिझाईनमध्ये खूप नवीनता पाहायला मिळणार आहे. नवीन बोनेट, बंपर, हेडलाइट्स, फ्रंट ग्रिल, साईज डिझाइन आणि कारच्या मागील लूकमध्ये बदल असतील. याशिवाय केबिनचे डिझाइन पूर्णपणे बदलले जाणार आहे. अनेक नवीन फीचर्सचाही समावेश करण्यात येणार आहे. यावेळी तुम्हाला नवीन स्विफ्टमध्ये मोठा डिस्प्ले मिळेल. नवीन स्विफ्टचे इंजिन पुन्हा ट्यून केले जाईल.

नवीन मॉडेलमध्ये नवीन अपग्रेड केलेले पेट्रोल इंजिन मिळेल जे हायब्रिड वैशिष्ट्याने सुसज्ज असेल. हे इंजिन चांगल्या मायलेजसह पॉवरफुल परफॉर्मन्स देईल. यात मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय असेल.





