Newasa News : वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड संभाजी काळे; उपाध्यक्षपदी अॅड. राजू इनामदार यांची निवड
Newasa News : वकील संघाच्या झालेल्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड जी. एम निकम व अँड ए. जी करडक यांनी काम पाहिले.

नेवासे : नेवासे तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अँड. संभाजी काळे तर उपाध्यक्षपदी अँड राजू इनामदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या झालेल्या निवडणुकीत सचिवपदी ॲड. जमीर शेख तर महिला उपाध्यक्षपदी ॲड. मधुबाला बिंगी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक प्रक्रिया अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
वकील संघाच्या झालेल्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड जी. एम निकम व अँड ए. जी करडक यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार व निवड प्रमाणपत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे व दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. हस्तेकर तसेच वरिष्ठ विभागाचे व्ही. एन. मोरे, एस. एन. भोसले व इतर न्यायिक अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. एस आर थोरे, ॲड बी. एस काळे, ॲड एम. आर कुटे, ॲड. बी. एस शिरसाट, ॲड ए. जी करडक ॲड. जी एम निकम, अँड. डी. एम जाधव, अँड. कल्याण पिसाळ, ॲड. कैलास कापसे, ॲड. अजय रिंधे, ॲड प्रशांत माकोणे तसेच नेवासे तालुका वकील संघाचे सर्व पदाधिकारी विधिज्ञ मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




