Adnan Ahmed Boxing : लक्षावधींची नोकरी सोडली अन् दुबईत पाकिस्तानी बॉक्सरला लोळवले; अदनान अहमदने फडकावला तिरंगा
Adnan Ahmed Boxing : बदाऊनचा बॉक्सर अदनान अहमदने ६ नोव्हेंबरच्या रात्री दुबईमध्ये पाकिस्तानी बॉक्सर अबुबकर शेखचा पराभव केला.

Adnan Ahmed Beats Pakistani Boxer Abubakar Shaikh In Dubai : जिद्द, कठोर मेहनत आणि खेळाप्रती अफाट आवड असेल तर माणूस यशाचे कोणतेही शिखर गाठू शकतो, हे उत्तर प्रदेशातील बदायूं येथील युवा बॉक्सर अदनान अहमदने सिद्ध करून दाखवले आहे. पंचतारांकित हॉटेलमधील लक्षावधी रुपयांच्या पॅकेजची सुरक्षित नोकरी सोडून त्याने बॉक्सिंगच्या रिंगणात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. दुबईत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत अदनानने पाकिस्तानचा तगडा बॉक्सर अबूबकर शेख याला धुळ चारत भारताचा तिरंगा दिमाखात फडकवला आहे. त्याच्या या ऐतिहासिक विजयाची चर्चा आता केवळ देशातच नव्हे, तर सातासमुद्रापार होत आहे.
हॉटेल मॅनेजमेंटची पदवी अन् ग्रँड हयातमध्ये लक्षावधींचे पॅकेज
अदनान अहमदचे वडील सलमान जमीर हे विकास भवनातून निवृत्त अधिकारी आहेत. अदनानने बरेलीच्या हार्टमन कॉलेजमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर गोव्यातील नामांकित कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बी.एस्सी.ची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण होताच त्याला गोव्यातील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल हयात ग्रँडमध्ये उच्च वेतनाची आकर्षक नोकरी मिळाली. करिअरची उत्कृष्ट सुरुवात आणि सुरक्षित भविष्य समोर असतानाही अदनानचे मन मात्र फिटनेस आणि बॉक्सिंगच्या विश्वात रमत होते.
नोकरीचा राजीनामा देऊन बॉक्सिंगच्या रिंगणात उडी –
लहानपणापासूनच अदनानला शरीरसौष्ठव आणि फिटनेसची प्रचंड आवड होती. नियमित व्यायामादरम्यान त्याची बॉक्सिंगमधील रुची वाढत गेली आणि हेच त्याचे अंतिम ध्येय बनले. अखेर एका क्षणी मोठा धोका पत्करून त्याने हॉटेल मॅनेजमेंटची नोकरी सोडली आणि पूर्णवेळ बॉक्सिंगला वाहून घेतले. सुरक्षित नोकरी सोडून अनिश्चिततेच्या क्षेत्रात उतरणे कुटुंबासाठी आव्हानात्मक होते; मात्र अदनानने स्वतःच्या क्षमतेवर अढळ विश्वास ठेवून दिवस-रात्र कठोर सराव सुरू ठेवला.
बदायूं के अदनान अहमद ने दुबई में पाकिस्तानी मुक्केबाज अबूबकर शेख को हराया। https://t.co/kk18G45TBa
— The Pressmark (@thepressmark) November 7, 2026
दुबईत पाकिस्तानच्या अबूबकर शेखला चारली धूळ –
अदनानच्या या कठोर तपश्चर्येचे चीज दुबईत आयोजित आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत झाले. या स्पर्धेत त्याचा सामना पाकिस्तानचा बॉक्सर अबूबकर शेख याच्याशी झाला. शुक्रवारी रात्री झालेल्या या अत्यंत चुरशीच्या लढतीत दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली. मात्र, अदनानने आपल्या चपळ हालचाली, अचूक ठोसे आणि रणनीतीच्या जोरावर पाकिस्तानी बॉक्सरला निष्प्रभ करत एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर भारताचे नाव उंचावले आहे.
बदायूं ते अमेरिकेपर्यंत फटाक्यांची आतषबाजी अन् जल्लोष –
बदायूं। दुबई के पर्स जुमैरा में आयोजित रोमांचक बाक्सिंग मुकाबले में जिले के रमजानपुर गांव के रहने वाले युवा मुक्केबाज अदनान ने पाकिस्तान के मुक्केबाज अबू बकर को हराकर देश और जिले का नाम रोशन कर दिया है।
रात नौ बजे से शुरू होकर देर रात तक चले इस कड़े मुकाबले में दोनों खिलाड़ियों के बीच रिंग में जबरदस्त टक्कर देखने को मिली, जहां अदनान ने अपने बेहतरीन कौशल, तेज पंचों और सूझबूझ का परिचय देते हुए पाकिस्तानी मुक्केबाज को अंततः पछाड़ दिया।
इस ऐतिहासिक जीत की खबर मिलते ही रमजानपुर सहित पूरे जिले में जश्न का माहौल है और खेल प्रेमियों द्वारा अदनान की इस बड़ी उपलब्धि पर गर्व व्यक्त किया।
#JagranNews #Adnan
— Dainik Jagran (@JagranNews) November 7, 2026
अदनानच्या विजयाची बातमी समजताच उत्तर प्रदेशातील बदायूं, बरेली आणि संभलमध्ये प्रचंड जल्लोष करण्यात आला. बरेलीतील आनंद विहार येथील त्याच्या घरावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तर बदायूमधील मूळ गावी रमझानपूर येथे ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. विशेष म्हणजे, अदनानच्या या यशाचा आनंद त्याच्या मित्रांनी अमेरिकेतील बॉस्टन आणि फिलाडेल्फिया येथेही साजरा केला. मुलाच्या संघर्षाचे चीज झाल्याने कुटुंबीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.





