satara | यशोदा इन्स्टिट्यूटमध्ये मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी प्रवेश सुरू

सातारा,(प्रतिनिधी) – यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये नवनवीन विद्याशाखांचा समावेश करण्यात आला आहे. मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या अद्ययावत अभ्यासक्रमाला देखील प्रवेश घेता येणार आहे.
चालू शैक्षणिक वर्ष इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असून मेकेट्रॉनिक्स इंजिनिअरिंग सोबतच रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी यादेखील अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती यशोदा इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, आणि प्राचार्य डॉ. पी. आर. बडदापुरे यांनी दिली.
मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हे एक बहुविद्याशाखीय क्षेत्र आहे. जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, विज्ञान आणि नियंत्रण अभियांत्रिकी यांना स्मार्ट सिस्टम आणि उत्पादने डिझाइन आणि तयार करण्यासाठी एकत्रित करते.
मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अधिक हुशार, अधिक कार्यक्षम आणि अधिक जुळवून घेणाऱ्या प्रणाली तयार करण्याबद्दल आहे जे त्यांच्या वातावरणाशी अखंडपणे संवाद साधू शकतात, उत्पादनांच्या आणि प्रणालींच्या विस्तृत श्रेणीच्या क्षमता आणि कार्यप्रदर्शन वाढवतात.
यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये नेहमीच प्रगत आणि अध्यायावत अभ्यासक्रमांना प्राधान्य दिले जाते याचाच भाग म्हणून इंजीनियरिंग महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग,
कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकामुनिकेशन इंजीनियरिंग यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या विद्याशाखा मार्फत अभ्यासक्रम पुरवले जात आहेत.
कॉर्पोरेट क्षेत्राच्या उपलब्ध असणाऱ्या संधी आणि गरजा लक्षात घेऊन यशोदा इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांनी नेहमीच नवनवीन अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. कॉर्पोरेट क्षेत्राची प्रत्येक गरज भागवणारा युवक हा यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये तयार झाला पाहिजे असा मानस त्यांचा आहे.
यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये उपलब्ध असणारा स्वतंत्र ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल, हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरती विशेष लक्ष देतो विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांच्या कार्यकाळामध्ये सॉफ्टस्किल्स, टेक्निकल स्किल्स याची तयारी करून घेतली जाते. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप सोबत प्लेसमेंटच्या देखील विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
सध्याचे युग हे जागतिकीकरणाचं आणि माहिती तंत्रज्ञानासोबतच ऑटोमेशनचा असले कारणाने मेकेट्रॉनिकस इंजिनिअरिंग रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स सायबर सिक्युरिटी या अभ्यासक्रमांना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
सदरच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती घेण्यासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पस ला भेट द्यावी असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रवीणकुमार बडदापुरे यांनी केले आहे.





