मुंबई – बॉलीवूडचा हॅंडसम अभिनेता म्हणून ओळख असणारा कार्तिक आर्यन सध्या इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने बॉलीवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अनेक तरुणींना त्याने वेड लावले आहे. अनेक सुपरहिट चित्रपटात त्याने काम केले आहे. आता लवकरच कार्तिक आर्यनचा जागतिक पातळीवर सन्मान केले जाणार आहे.
कार्तिकने वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजंन केले आहे. त्याच्या या विविध भूमिकांना प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाला. कार्तिक आर्यनला फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याने दिलेल्या योगदानासाठी आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘रायझिंग ग्लोबल सुपरस्टार ऑफ इंडियन सिनेमा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. व्हिक्टोरिया सरकारच्या हस्ते 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या समारंभात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
बॉलीवूडचे प्रसिद्ध समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटद्वारे ही बातमी चाहत्यांना दिली आहे. यानंतर कार्तिकवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. कार्तिक आर्यनने पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मेलबर्नच्या 14 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे त्याने म्हंटले आहे. याप्रकरणी त्याने व्हिक्टोरियन सरकारचे आभारही मानले आहेत.
Join us at the 14th edition of the INDIAN FILM FESTIVAL OF MELBOURNE 2023 as we roll out the red carpet to welcome KARTIK AARYAN – THE RISING GLOBAL SUPERSTAR OF INDIAN CINEMA! pic.twitter.com/DfIPAjiJPE
— Indian Film Festival of Melbourne (@IFFMelb) July 24, 2023
दरम्यान, नुकताच कार्तिकचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट रिलीज झाला. याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात कार्तिकसह अभिनेत्री कियारा आडवाणी देखील मुख्य भूमिकेत होती. यासोबतच कार्तिकने ‘प्यार का पंचनामा’, ‘भूल भुलैया २’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.