“मंत्रिपद मिळावं म्हणून इम्प्रेस करण्यासाठी माझ्याविरोधात घोषणा” बॅनरबाजीच्या टीकेनंतर आदित्य ठाकरेंनी घेतला शिंदे गटातील आमदारांचा समाचार

मुंबई – आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.आज सकाळीच सत्ताधाऱ्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे कार्टून असलेला बॅनर हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली. बॅनरवर आदित्य ठाकरे यांचा परमपूज्य (प.पु) असा मार्मिक उल्लेख करत समाचार घेण्यात आल्याचे दिसून आले. या आंदोलन करणाऱ्यांचं मला वाईट वाटत आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
अधिवेशनापूर्वी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी शिंदे गटातील आमदारांच्या आंदोलनाचा जोरदार समाचार घेतला. पायऱ्यांवर ज्यांना उभ केलेलं मला त्यांचं वाईट वाटत,कीव येते. ५० खोके वेगैरे मला लोकांमधून ऐकू येतंय पण त्यांना जी खरी अपेक्षा होती मंत्रिपदाची ती मिळाली नाहीत म्हणून त्यांना इम्प्रेस करायला माझ्यावर बोलावं लागतंय असा टोला आदित्य ठाकरे यांनी पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या आमदारांना लगावला. गळ्यात काय काय घालून पायऱ्यांवर उभं राहावं लागतंय. मला त्यांची कीव येते. गद्दारी ही महाराष्ट्राला पटलेली नाही त्यांनाही कळतंय की जनतेचा त्यांना पाठींबा नाही. असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
आज तर ते याच पायऱ्यांवर शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी उभे असते,महिलांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी उभे असते किंवा तरुणांचे विषय असतील असे प्रश्न घेऊन जर ते उभे असते तर मला त्यांच कौतुक वाटल असत. आम्ही तुमच्यासाठी काय कमी केलं असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
बॅनरवरून आदित्य ठाकरेंवर निशाणा
शिंदे गटातील आमदारांनी आदित्य ठाकरेंचे कार्टून असलेला बॅनर सभागृहाबार झळकवत जोरदार घोषणाबाजी केली होती. युवराजांची नेहमीच दिशा चुकली,महाराष्ट्राचे परमपूज्य (प.पू ) असा उल्लेख बॅनरवर करत आदित्य टकरेंची खिल्ली उडवण्यात आली आहे. तसेच २०१४ मध्ये खुडचिसाठी हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली असे देखील या बॅनरवर लिहिण्यात आले. घरात बसून पर्यटन खातं चालवलं आणि सत्ता गेल्यावर पर्यटनाची लहर आली,पुन्हा निवडणूक लढवण्याची देतात ठसन आणि स्वत: आमदार होण्यासाठी महापौर आणि दोन आमदारांची लागते कुशन असा घणाघात देखील यावेळी विरोधकांनी आदित्य ठाकरेंवर बॅनरबाजीतून केला आहे.





