“…पण आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या नाहीत” ; राजकोट किल्ल्यावरून आदित्य ठाकरेंचा बोचरा वार

Aditya Thackeray on Narayan Rane । राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा फक्त आठ महिन्यांमध्ये कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट उसळलीय. याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आलं. मात्र हा मोर्चा होण्यापूर्वीच राजकोटवर कट्टर विरोधक खासदार नारायण राणे विरुद्ध ठाकरेंची शिवसेना आमने-सामने येऊन आले. एवढेच नाही तर नेत्यांच्या समोरच एकमेकांवर धावून जाण्याचा प्रकार सुद्धा याठिकाणी घडला.
एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार Aditya Thackeray on Narayan Rane ।
महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राजकोटवर पोहोचले असतानाच खासदार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह पुतळ्याची ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले. दरम्यान हा सर्व प्रकार सुरू असतानाच ठाकरे गटाचे आणि भाजप समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार सुद्धा घडला. एकमेकांच्या कार्यकर्त्यांना ओढून मारण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पुतळा पाहणीचा जो कार्यक्रम होता तो बाजूला पडून एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
त्यांना वाटत असेल आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या असतील Aditya Thackeray on Narayan Rane ।
हा सगळा गोंधळ सुरु असताना ठाकरे गटाकडून सुद्धा पोलिसांना इशारा देण्यात आला. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जर आम्हाला पंधरा मिनिटांमध्ये रस्ता करून दिला नाही, तर शिवसेना रस्त्यावरची संघटना आहे आम्ही सुद्धा दाखवून देऊ असा इशारा दिला. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर बोचरा वार केला. त्यांना वाटत असेल आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या असतील, पण तसं काही नाही म्हणत एक प्रकारे नारायण राणे यांना राजकोट किल्ल्यावर बोचरा वार करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर राडा; ठाकरे आणि राणे समर्थक एकमेकांना भिडले





