मुंबई : स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याची पाहायला मिळत आहे. या गाण्यानंतर शिवसेनेच्या समर्थकांनी खारच्या युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये जाऊन तोडफोड केली तर दुसरीकडे कुणाल कामराविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली आहे. काय म्हणाले आदित्य ठाकरे? शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीचा निषे केला. भगत सिंह कोश्यारी, कोरटकर, राहुल सोलापूरकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरतात तेव्हा त्यांच्या घरावर कधी आंदोलन करतील का,? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनीच आपला नेता चोर आणि गद्दार आहे हे ठरवले आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. मिरची का लागली हे सांगावं गद्दार आणि चोर हे तेच आहेत असे एकनाथ शिंदे यांनी ठरवले का? कुणाल कामरा याने असे काय म्हटले ज्याने शिंदेंना झोंबलं आहे. एकनाथ शिंदे यांनी गद्दार चोर असल्याचे मान्य केलंय का असा बोचरा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.