“फडणवीस दावोसला गेले पण उपमुख्यमंत्री नाराज होऊन कुठे गेले शोधा?” ; ठाकरे गटाचा एकनाथ शिंदेंना टोला

Aditya Thackeray on Eknath Shinde । राज्यात सध्या महायुतीमधील नेत्यांच्या पालकमंत्री पदावरून नाराजीनाट्याचा नवा अंक सुरु आहे. देवेंद्र फडणवीसांनी दोन दिवसापूर्वी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. याच यादीवरून सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या नाराजीवरून त्यांनी मुंबई सोडून थेट त्यांचे दरे गाव गाठले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता याच परिस्थितीवर ठाकरे गटाकडून त्यांना टोला लगावण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कुठे गेले? Aditya Thackeray on Eknath Shinde ।
पालकमंत्री पदावरून नाराज असलेले उपमुख्यमंत्री त्यांच्या मूळगावी गेले असल्याचे सांगण्यात आले असताना आता “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेलेत, पण ते उपमुख्यमंत्री नाराज होऊन कुठे गेले? आज चंद्र दिसतोय का ते बघा? ते कोणत्या गावाला गेले ते शोधा? असे म्हणत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे.
सह पालकमंत्री म्हणजे ते त्या त्या जिल्ह्याचे मालकमंत्री Aditya Thackeray on Eknath Shinde ।
दावोसमधून जर राज्यासाठी काही मोठं येत असेल तर त्याचं आम्ही स्वागत करु. पण मागील दावोस दौऱ्यात जो खर्च करण्यात आला, जी उधळपट्टी झाली ती होऊ नये असेही आदित्य ठाकरे म्हणाले. सह पालकमंत्री म्हणजे ते त्या त्या जिल्ह्याचे मालकमंत्री आहेत असा टोला देखील आदित्य ठाकरेंनी महायुतीला लगावला.
…तरीपण बांगलादेशी आले कसे?
संतोष देशमुख प्रकरणी देखील आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. वाल्मिक कराडला हे पकडू शकले नाही, तो शरण आल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. पण सैफ प्रकरणात पोलिसांना मोकळीक दिली तर ते कसे काम करु शकतात याचं उदाहरण आपण काल पाहिलं आहे. पोलिसांच आम्ही अभिनंदन करतो असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 10 वर्ष झालं भाजप सरकार आहे. बांगलादेशी विरोधात मोर्चा काढतात तरीपण हे घुसखोर बांगलादेशी आले कसे? आपलं केंद्र सरकार काहीच करू शकत नाही का? हे आरोपी बांगलादेशी राहत कुठे? तर ठाणे शहरात असेही म्हणत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारवर टीका केली आहे.





