आदिनाथ कोठारे झळकणार ‘गांधी’ वेब सीरिजमध्ये

Actor Adinath Kothare| अभिनेता आदिनाथ कोठारेने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्राला सुरुवात केली. आतापर्यंत त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकताच तो ‘शक्तिमान’ चित्रपटात झळकला होता. यानंतर आता लवकरच आदिनाथ एका नव्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळणार आहे. आदिनाथ एका हिंदी वेबसिरिजमध्ये काम करणार आहे.
आदिनाथ हंसल मेहता दिग्दर्शित ‘गांधी’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. मात्र यात तो नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार आहे. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु त्याच्या या नव्या वेबसिरिजविषयी चाहते देखील उत्सुक आहेत. येणाऱ्या काळात तो अनेक नवनवीन भूमिका साकारणार आहे.
आदिनाथच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, कपिल देव यांच्यावर आधारित ‘८३’ चित्रपटात आदिनाथने क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांची भूमिका साकारली होती. सध्या छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांची निर्मिती कोठारे व्हिजन्सने केली आहे. ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’, ‘आई’, ‘माझी माणसं’ अशा कोठारे व्हिजन्सच्या अनेक मालिका घराघरांत लोकप्रिय आहेत. गांधी वेबसिरिज आदिनाथ झपाटलेला 3 चित्रपटात देखील दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये प्रतीक गांधी महात्मा गांधींच्या जीवनावर बनत असलेल्या दिसणार आहे. Actor Adinath Kothare|
हेही वाचा:
निवडणूक प्रचारादरम्यान डेन्मार्कच्या पंतप्रधानांवर हल्ला ; अज्ञात इसमाकडून धक्काबुक्की





