आयुष प्रसाद यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार
Updated On:

पुणे – पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राम हे पंतप्रधान कार्यालयात रुजू झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
राम यांची दि.4 ऑगस्ट रोजी पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राम यांनी दि.8 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी पदाचा पदभार सोडला. तो कार्यभार जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.





