Satara: माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी जादा बसेस
Satara जिल्ह्यात पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी टप्प्याटप्याने बसेस सोडण्यात येणार आहेत.

Satara: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाच्या सातारा विभागाने विशेष नियोजन केले आहे. सोहळ्याचा मुक्काम असलेल्या लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे जाणार्या भाविकांसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी टप्प्याटप्याने बसेस सोडण्यात येणार आहेत. लोणंद येथे 15 जुलैला 85, तरडगाव येथे 16 जुलैला दहा, फलटण येथे 17 जुलैला 85, बरड येथे 18 जुलैला दहा जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी प्रवाशांच्या गरजेनुसार बस उपलब्ध करून दिल्या जातील. सुरक्षित आणि वेळेत सेवा देण्यासाठी अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी दिली.





