Adani Group : अदानींच्या पाच कंपन्यांचे शेअर तेजीत, सर्व काही ठीक असल्याचा युक्तिवाद…

मुंबई – अदानी समुहातील काही महत्त्वाच्या व्यक्तीवर न्यूयॉर्क येथील न्यायालयात भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आल्यानंतर गेल्या आठवड्यात या समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात बरेच चढउतार होत असल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांचे नुकसान होत आहे. आता अदानी समूहाने आपली गुंतवणूक विषयक परिस्थिती ठीक आहे असे म्हटले आहे.
अमेरिकेतील न्यायालयातील आरोप किरकोळ आहेत असे या समूहाने स्पष्ट केल्यानंतर कालपासून या समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात बरीच सुधारणा झाली आहे. अदानी समूहातील वरिष्ठ व्यक्तीवर अमेरिकेत झालेले आरोप किरकोळ स्वरूपाचे आहेत. काही आर्थिक दंड केल्यानंतर हे प्रकरण मिटेल. मुळात न्यायालयात जे आरोप झाले आहेत ते आधारहीन आहेत. आम्ही वकिलाच्या माध्यमातून युक्तिवाद करून हे आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध करू असे काल अदानी समूहाने शेअर बाजारांना कळविल्यानंतर काल बहुतांश कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली होती.
आता इतर काही देशातील गुंतवणूकदार अजूनही अदानी समूहा बरोबर ठामपणे उभे आहेत असे स्पष्टीकरण अदानी समूहाने केले. यामुळे आजही या समूहाबाबत शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते. या समूहातील पाच कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढले. त्यातल्या त्यात अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरचा भाव सोळा अदानी वाढला. या कंपनीत फ्रान्समधील कंपनीची गुंतवणूक आहे. या कंपनीने आरोप जोपर्यंत चुकीचे असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत गुंतवणूक थांबविलेले आहे.
अदानी गॅस कंपनीच्या शेअरचा भाव सोळा टक्क्यांनी, अदानी एनर्जी सोल्युशन कंपनीच्या शेअरचा भाव दहा टक्क्यांनी, अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरचा भाव दहा अदानी, अदानी पावर कंपनीच्या शेअरचा भाव सात अदानी, तर अदानी एंटरप्राईजेस कंपनीच्या शेअरचा भाव दीड अदानी वाढला.
Gold-Silver Rate : चांदीचा दर घसरून तीन महिन्याच्या निचांकावर…
मात्र अदानी पोर्टस् कंपनीच्या शेअरचा भाव तीन अदानी, एनडीटीव्ही कंपनीच्या शेअरचा भाव दोन अदानी, एसीसी कंपनीच्या शेअरचा भाव एक टक्क्याने. अंबुजा सिमेंट कंपनीच्या शेअरचा भाव अर्धा टक्क्याने, अदानी विल्मर कंपनीच्या शेअरचा भाव 0.44 टक्कयानी, तर सांगी इंडस्ट्रीजच्या शेअरच्या भावात किरकोळ घट झाली. दरम्यान अबुधाबी, श्रीलंका आणि टांझानियातील गुंतवणूक आणि प्रकल्प कामकाजावर कसलाही परिणाम झाला नसल्याचे या समूहाने सांगितले आहे.





