Adani Group : अमेरिकेने केलेल्या आरोपांवर अदानी समुहाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांच्या कंपनी अदानी ग्रीन एनर्जीच्या संचालकांवर अमेरिकेचे न्याय विभाग आणि एसईसी यांनी लावलेल्या आरोपांवर अदानी समूहाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हणत अदानी ग्रुपने सर्व आरोप फेटाळले आहेत.
अदानी समुहाने जारी केले निवेदन
यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने स्वतः सांगितल्याप्रमाणे, आरोपपत्रातील आरोप हे केवळ आरोप आहेत. दोषी सिद्ध होईपर्यंत आणि जोपर्यंत गुंतलेले आहेत ते निर्दोष मानले जातात. सर्व शक्य कायदेशीर उपाययोजना केल्या जातील असे गटाने म्हटले आहे. यासोबतच भागधारकांना आश्वासन देताना अदानी समूहाने नेहमीच सर्व क्षेत्रात पारदर्शकता आणि नियामक नियमांचे पालन केले आहे आणि यापुढेही करत राहील, असे अदानी समूहाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
UPDATE: Adani Group denies the allegations. pic.twitter.com/UtvzitdJCX
— Live Law (@LiveLawIndia) November 21, 2024
काय आहे नेमके प्रकरण?
गौतम अदानी यांच्यावर सौरऊर्जा प्रकल्पाशी संबंधित कंत्राट मिळवण्यासाठी अमेरिकेतील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीला २६५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २२३६ कोटी रुपये) लाच दिल्याचा आरोप आहे. बँका आणि गुंतवणूकदारांपासून लपवल्याचा आरोप आहे.
अदानी समूहाचे शेअर्स घसरले
या सगळ्या प्रकरणाचा परिणाम अदानी समूहाच्या शेअर्सवर दिसून आला. अदानी एंटरप्रायझेस (20%), अदानी एनर्जी सोल्युशन्स (20%), अदानी ग्रीन एनर्जी (19.17%), अदानी टोटल गॅस (18.14%), अदानी पॉवर (17.79%), अदानी पोर्ट्स (15%) , अंबुजा सिमेंट्स (14.99%), ACC शेअर्स (14.54%), NDTV शेअर्स (14.37%) आणि अदानी विल्मार (10%) या शेसर्स मध्ये मोठी घसरण झाली. यामुळे अदानी समूहाचे 2.2 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.





