अदा शर्माचा नवा फिटनेस मंत्रा! ‘पंपकिन कोअर वर्कआउट 3.0’ करण्याचा दिला सल्ला; व्हिडीओ व्हायरल

Adah Sharma : बॅालिवूड इंडस्ट्रीत कलाकार मंडळी त्यांच्या खाजगी आयुष्यातून काही वेळ व्यायमासाठी देतात. जवळपास सगळ्यांचे कलाकारांचे व्यायाम करण्याचे रुटीन ठरलेले असते. द केरला स्टोरी फेम अभिनेत्री अदा शर्मा देखील तिच्या व्यायामाबद्दल सतर्क आहे. अभिनेत्रीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये तिने चाहत्यांना ‘पंपकिन कोअर वर्कआउट ३.०’ या नवीन फिटनेस चॅलेंजबद्दल माहिती दिली आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने वर्कआउट फक्त ३१ दिवसांत तुमचे आयुष्य बदलू शकते, असा दावा केला आहे. व्हिडीओमध्ये तिने चाहत्यांना दररोज २० वेळा भोपळ्याने हा व्यायाम करण्याचा सल्ला दिला.
या व्यायमामुळे स्नायूंना बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करते. इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने लिहिले, “पंपकिन कोअर वर्कआउट ३.० हे ३१ दिवस, २० वेळा करा आणि तुमचे आयुष्य बदला! पंपकिन कोअर वर्कआउट ३.० कोण वापरत आहे? मला टॅग करा, मी प्रतिसाद देईन.” असे तिने व्हिडीओच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagram
या पोस्टसोबत तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्वतः या व्यायामाचे प्रात्यक्षिक करून दाखवत आहे. तिने भोपळ्याचा वापर आधार म्हणून केला आहे. अभिनेत्रीने यापूर्वी अशाच प्रकारच्या एका वेगळ्या व्यायामाबद्दल एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने सांगितले की, जर तुम्ही एका हाताने हळूहळू आणि दुसऱ्या हाताने जलद व्यायाम करत असाल तर ते तुमच्या मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे.
या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. “नवीन योग शिक्षक अनलॉक झाला.” दुसऱ्याने वापकर्त्यांने लिहिले, “वाह, किती मजेदार आणि मजेदार कसरत आहे.”





