सलमानसोबत झळकलेली अभिनेत्री ट्रोलर्सच्या निशाण्यावर; पतीसोबतचा एअरपोर्टवरील व्हिडिओ व्हायरल

Bhumika chawla | बॉलीवूडमधील काही अभिनेत्रींनी मोठे यश संपादन केल्यानंतर अचानक सिनेइंडस्ट्रीला राम-राम ठोकला. सलमान खानच्या ‘तेरे नाम’ सिनेमात मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री भूमिका चावला रातो रात स्टार झाली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक देखील करण्यात आले. पण या सिनेमानंतर ती फार कुठे दिसली नाही. 2003 साली आलेल्या सतीश कौशिक दिग्दर्शित आणि जैनेंद्र जैन लिखित ‘तेरे नाम’ चित्रपटाची गाणी आणि सलमानची स्टाइल आजही लोकप्रिय आहे.
या चित्रपटाच्या 21 वर्षानंतर भूमिका आता पुन्हा चर्चेत आली आहे. तिचा एअरपोर्टवरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती तिच्या पती सोबत एअरपोर्टच्या बाहेर पडताना दिसत आहे. या व्हिडिओत भूमिकाला पाहून चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला, पण तिच्या पतीला ट्रोल केलं आहे.
या व्हिडिओत भूमिकाचा पती पापाराझीवर चिडलेला दिसतो. एका फोटोसाठी काय तुमचा गोंधळ सुरू आहे, असं तो बोलताना दिसतो. यावरून एका नेटकऱ्याने म्हंटले की, आपली पत्नी आपल्यापेक्षा लोकप्रिय हे त्याला पटत नाही, तर दुसऱ्या एका युझरनं ‘कोणत्या छपरी माणसासोबत लग्न केलं’, असं म्हटले आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओत भूमिका ब्लँक प्रिंटेड टी-शर्ट, काळी ट्रॅक पँट आणि जॅकेटमध्ये दिसली. यातील ‘नो मेकअप’ लूकचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. वयाच्या 46 वर्षी सुद्धा भूमिका तेवढीच फिट आणि सुंदर दिसते.
भूमिका चावलाने 2007 मध्ये भरत ठाकूर यांच्याशी लग्न केलं. लग्नापूर्वी दोघेही जवळपास चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. भूमिकाचे पती भरत ठाकूर हे योगा शिक्षक आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक ध्यान कार्यशाळा, योग सत्रे आणि कॉर्पोरेट योग कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.
हेही वाचा:





