अभिनेत्री उर्वशी रौतेला रुग्णालयात दाखल; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Urvashi Rautela Health | अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती रुग्णालयात दाखल झाल्याचे दिसत आहे. यावरून काहींनी तिच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. तर काहींनी तिला ट्रोल केले आहे.
उर्वशीची तब्बेत ठिक नसून ती हॉस्पिटलमध्ये एडमिट असल्याचे दिसते. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये उर्वशीच्या हातातून रक्त येत आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये खुर्चीवर बसलेली असून ऑक्सिजन मास्क लावलं असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
उर्वशीने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये ‘माझ्यासाठी प्रार्थना करा…’ असं लिहिलं आहे. ही पोस्ट व्हायरल होताच तिचे चाहते कंमेंट करत तिला काय झालंय? विचारत आहेत. तर काही जण तिला ट्रोल करत आहे. ‘हाताला थोडसं लागल्यावर कोण हॉस्पिटलमध्ये एडमिड होतं’, असे काहींनी तिला म्हंटले आहे. तर काहींनी फक्त प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी असं करते, असं म्हटलं आहे.
उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘सिंह साब द ग्रेट’, ‘सनम रे’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘हेट स्टोरी 4’ आणि ‘पागलपंती’ यांसारख्या सिनेमांमध्ये तिने काम करत लोकप्रियता मिळवली.
हेही वाचा:
एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, तिरुअनंतपुरम विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित





