Trisha Krishnan : सध्या तामिळनाडूच्या राजकारणात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. टीव्हीकेचे सर्वेसर्वा आणि भावी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून थलपती विजय यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्या टीव्हीके पक्षाने विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवत तब्बल 108 जागांवर विजय मिळवला. मात्र, बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी काही जागांची गरज विजय यांच्या पक्षाला असल्याने तशी जुळवाजुळव केली जात आहे. अशातच विजयची कथित गर्लफेंड अभिनेत्री त्रिशा कृष्णन राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एका न्यूज वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री त्रिशा कृष्णन देखील विजयच्या टीव्हीके या पक्षात सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली पूर्व मतदारसंघातून तिने पोटनिवडणूक लढवावी आणि विजयप्रमाणे सक्रीय राजकारणात प्रवेश करावा असे बोलले जात आहे. विजयने या निवडणुकीत दोन मतदार संघात विजय मिळवला आहे. पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व असे दोन मतदार संघ आहेत. नियमानुसार १४ दिवसांच्या आता यापैकी एका जागेचा राजीनामा द्यावा लागतो. त्यानंतर संबंधित विधानसभेची जागा रिक्त होईल आणि पोटनिवडणुकीची घोषणा केली जाईल. माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार,विजयला पेरांबूर येथून चांगले मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे विजय तिरुचिरापल्ली पूर्व जागेवरून राजीनामा देऊ शकतो, अशी चर्चा आहे. समजा ही जागा रिक्त झाली तर पोटनिवडणुकीसाठी अभिनेत्री त्रिशा कृष्णनचे नाव पुढे आले आहे. मात्र, अभिनेत्रीच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या असल्या तरी अद्यापर्यंत याबाबत अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. अनेक माध्यमांच्या वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, विजय ७ मे रोजी तामिळनाडूचा पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतो. दरम्यान, थलपती विजय आणि त्रिशा कृष्णन यांच्या डेटिंगच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून होत आहेत. मात्र, यावर दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हेही वाचा : Suvendu Adhikari PA Shot Dead: बंगालमध्ये रक्तरंजित थरार ! सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या ; ममता बॅनर्जींचा कट असल्याचा भाजपचा आरोप