अभिनेत्री तेजस्वी प्रकाश मास्टरशेफ कार्यक्रमादरम्यान झाली जखमी

Tejasswi Prakash Injured | अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ‘नागिन’ मालिकेद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आली. यातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची देखील मोठी पसंती मिळाली होती. अलीकडेच तेजस्वी मास्टर शेफ या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमात सिनेसृष्टीतील मोठे चेहरे वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करतात. मात्र याच कार्यक्रमादरम्यान तेजस्वी प्रकाश जखमी झाली.
कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान तेजस्वीचा हात भाजला आहे. तेजस्वीनेच याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी तेजस्वी प्रकाश सेलिब्रिटी मास्टरशेफच्या सेटवर दिसली. यावेळी तिने ब्लू टॉप आणि ग्रे जॉगर परिधान केले होते. शूटिंग संपल्यानंतर तिने पापाराझींना फोटोसाठी पोज दिल्या. Tejasswi Prakash Injured |
यावेळी बोलताना तिने तिचा हात जळाल्याचं सांगितलं. खाद्यपदार्थ तयार करताना ही जखम झाल्याचं तिने सांगितलं आहे. ओव्हनमुळे तिचा हात भाजल्याचं तिनं म्हटलं आहे. यावेळी तेजस्वीने हाताला क्रिम लावल्याचंही दाखवलं. तेजस्वीची अवस्था पाहून चाहत्यांनीही तिच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. Tejasswi Prakash Injured |
View this post on Instagram
तेजस्वी व्यतिरिक्त मास्टर शेफच्या शोमध्ये बिग बॉस सीझन 12 ची विजेती दीपिका कक्कड इब्राहिम, गौरव खन्ना, राजीव अदातिया, निक्की तांबोळी, फैजल मलिकसह इतर अनेक स्टार्स सहभागी झाले आहेत. सध्या हा शो पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत. Tejasswi Prakash Injured |
दरम्यान, तेजस्वीने चित्रपटांमध्येही काम केले आहे. याशिवाय ती बिग बॉस सीझन 15 ची विजेती आहे. सध्या तेजस्वी प्रकाश तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. तेजस्वी प्रकाश अनेक दिवसांपासून अभिनेता करण कुंद्राला डेट करत आहे. अनेकदा दोघे एकत्रही दिसतात.
हेही वाचा:
‘अजित पवारांचा 20 हजार मतांनी पराभव झालाय’, उत्तम जानकरांनी EVM चे गणित मांडत थेट आकडेवारीच दिली





