अभिनेत्री तारा सुतारिया-वीर पहारियाच्या रिलेशनशिपच्या चर्चा: फॅशन वीकमध्ये जुळली केमिस्ट्री?

Bollywood actress Tara Sutaria : बॅालीवूड अभिनेत्री तारा सुतारिया आणि स्काय फोर्स चित्रपटफेम अभिनेता वीर पहारिया यांच्या रिलेशनशिपची चर्चा मनोरंजन विश्वात रंगू लागल्या आहेत. या दोघांनाही एकत्र डिनर डेट्सवर पाहिल्यापासून त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चांनी जोर धरला आहे.
नुकतेच तारा आणि वीर हे दोघेही एका फॅशन वीकमध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात दोघेही एकत्र पाहायला मिळाले. हे दोघेही या कार्यक्रमात शोस्टर म्हणून सहभागी झाले होते. या कार्यक्रमात दोघांची केमिस्ट्रीमुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत आहेत. तसेच दोघेही अनेकदा डिनर डेट्सवर देखील पाहायला मिळाले होते. मात्र, तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांनी आपल्या नात्याबद्दल अधिकृत कोणतीही घोषणा केलेली नाही.
भारताचे माजी गृहमंत्री सुशील शिंदे यांचे नातू वीर पहाडिया आहे. नुकतीच स्काय फोर्स चित्रपटात वीर यांनी बॅालीवूडचा खिलाडी कुमार अक्षयसोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटातून वीरने बॅालीवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याच्या स्काय फोर्स चित्रपटातील भूमिकेचे कौतुक करण्यात आले होते. यापूर्वी त्याचे नाव मानुषी छिल्लर आणि सारा अली खान यांच्यासोबत जोडण्यात आले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, दोघेही वीर आणि तारा हे एकमेकांना काही महिन्यांपासून डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. या डेटमधून ते एमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत.





