“इंटिमेट सिन करताना अनेकदा…” अभिनेत्री तमन्ना भाटियाने स्पष्टच सांगितलं

मुंबई – अभिनेत्री तमन्ना भाटिया साऊथसह बॉलिवूडमध्ये देखील खूप प्रसिद्ध आहे. साऊथचे दिग्दर्शक तर तमन्नाला ‘लकी अभिनेत्री’ मानतात कारण तमन्नाने काम केलेला हर एक साऊथ सिनेमा हिट ठरला आहे. म्हणूनच चाहते देखील तमन्नाला भरभरून प्रेम देतात. नुकतंच तमन्नाने एका मुलाखतीदरम्यान आपल्या इंटिमेट सिनबाबत खुलासा केला आहे.
दिसायला सुंदर,उत्तम डान्स, चांगला अभिनय यासोबतच तमन्ना कथेच्या गरजेनुसार अनेकदा बोल्ड सिन देताना देखील दिसते. नुकतंच तिनं इंटिमेट सिन देताना कलाकाराच्या काय भावना असतात याबाबत खुलासा केला. इंटिमेट सिन करताना अनेकदा सहकलाकाराला काय वाटेल याचा जास्त विचार करतात. तमन्ना म्हणते,”अभिनेता पुरुष किंवा स्त्री आहे असा विचार न करता तो फक्त मानव आहे हे लक्षात घेण्याची गरज असते”.
बहुगुणी अभिनेत्री असल्यामुळे तमन्नाने विविध भाषणमध्ये हिट चित्रपट दिले आहेत. आतापर्यंत तिने साऊथमधील सर्वच बड्या कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. तमिळ आणि तेलगू सिनेमासोबत तमन्नाने बॉलिवूडच्या हमशकल,हिम्मतवाला,इंटरटेन्मेन्ट,बबली बाउन्सर या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. बाहुबली सारख्या बिग बजेट चित्रपटामध्ये देखील तमन्ना ऍक्शन मोडमध्ये दिसली होती.


