अभिनेत्री स्वरा भास्करची पुन्हा वादग्रस्त पोस्ट; तो फोटो शेअर करत म्हणाली “..हा मूर्खपर्णा कधी संपेल”

Posted by Swara Bhaskar : जम्मू काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निरापराध भारतीय नागरिकांना आपले प्राण गमवावे लागली होते. त्यानंतर या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर भारताने पाकवर हवाई हल्ला करून दिले. ७ मे रोजी केलेल्या हवाई हल्ल्यात भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. सध्याच्या परिस्थितीत भारत आणि पाकमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा काळात लोकं भारताच्या पाठीशी असतानाच अभिनेत्री स्वरा भास्करने केलेल्या पोस्टमुळे वाद निर्माण झाला आहे.
अभिनेत्री स्वरा भास्करने तिच्या पोस्टद्वारे दोन्ही देशांमधील युद्धाला एक प्रचार म्हटले आहे. अनेकदा स्वरा भास्कर तिच्या स्टेटमेन्टमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडत असते. पुन्हा एकदा तिने अशा प्रकारचे विधान करून वाद ओढवून घेतला आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने जॉर्ज ऑरवेल यांचे एक वाक्य शेअर केले आहे, ‘प्रत्येक युद्ध हा प्रचार असतो. ओरडा, खोटेपणा आणि द्वेष नेहमीच अशा लोकांकडून येतो जे प्रत्यक्षात लढत नाहीत.’ यासोबतच तिने आणखी दोन स्टोरी शेअर केल्या आहेत.
या पोस्टमध्ये युद्ध हवे असलेल्या सर्वांसाठी एक संदेश लिहिला आहे की, ज्याला युद्ध हवे आहे त्याने एकदा आपल्या कुटुंबाकडे पहावे आणि विचार करावा की तो त्यांच्यापैकी कोणाला गमवण्यास तयार आहे. कारण, जर तुम्ही युद्धात उतरलात तर ते फक्त सीमेवर लढले जाणार नाही तर तुमच्या घराबाहेरही लढले जाईल. स्वराने हैदराबादमधील कराची बेकरीवर लोक तिरंगा फडकवत असलेला एक फोटोही शेअर केला आहे, ज्यावर तिने लिहिले आहे की हा मूर्खपणा कधी संपेल.
View this post on Instagram
स्वराने केलेल्या या पोस्टमुळे नवा वाद सुरू झाला आहे. अनेकांनी तिने व्यक्त केलेल्या मतदार तिला देशद्रोही म्हणत ट्रोल केलं आहे. अॅापरेशन सिंदूरला बॅालीवूडमधील अनेक कलाकरांनी पाठिंबा दर्शविला असताना स्वराने केलेली पोस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.





