अभिनेत्री शर्वरी बनली ‘यंग फिट इंडिया आयकॉन’; आनंद व्यक्त करत म्हणाली “ही माझ्यासाठी गर्वाची…”

Actress Sharvari : ‘मुंजा’ आणि ‘वेदा’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री शर्वरी राष्ट्रीय फिटनेस मोहिमेचा चेहरा बनली आहे. फिट इंडिया चळवळीअंतर्गत आयोजित ‘संडेज ऑन सायकल’ या उपक्रमात सहभागी झाल्यानंतर तिची ‘यंग फिट इंडिया आयकॉन’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या २५ व्या आवृत्तीत भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने ही नियुक्ती केली. ही मोहीम नागरिकांना तंदुरुस्ती आणि पर्यावरण संरक्षणासाठी सायकलिंग करण्यास प्रोत्साहित करते. तिची नियुक्त करण्यात आल्यानंतर तिने आनंद व्यक्त केला. “युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मला ‘यंग फिट इंडिया आयकॉन’ बनवल्याचा मला अभिमान आहे. ‘संडेज ऑन सायकल’ सारखे उपक्रम माझ्याकडून होत असल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया शर्वरीने दिली.
केवळ तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणाऱ्याच नाही तर पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचा भाग असणे माझ्यासाठी महत्वाचे असल्याचे तिने स्पष्ट केले. आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ‘फिट इंडिया चळवळ’चा एक शक्तिशाली विस्तार आहे आणि मला त्याचा भाग होता आले याचा मला अभिमान असल्याचे देखील शर्वरी बोलताना म्हणाली.
View this post on Instagram
शर्वरीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंजा या चित्रपटात काम केले आहे. तसेच अभिनेता जॅान अब्राहमसोबत वेदा चित्रपटात शर्वरीने आपला दमदार अभिनय दाखवून दिला. तिची या चित्रपटातील भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले.
हेही वाचा: “भारताकडून २० नव्हे तर २८ क्षेत्रे उद्ध्वस्त” ; ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी पाकिस्तानची मोठी कबुली





