एअर इंडिया फ्लाइटमधील अभिनेत्रीने शेअर केला अनुभव…

Celina Jaitley | अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान AI171 उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळले. या दुर्घटनेत 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. यावर अनेक बॉलीवूड कलाकरांनी दु:ख व्यक्त केले. यानंतर आता सेलिना जेटलीने देखील तिचा विमान प्रवासादरम्यानचा एक अनुभव शेअर केला आहे.
सेलिना जेटलीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “मार्च २०२५ मध्ये मी बहरीनवरुन परतत असताना एअर हॉस्टेसने चुकून ड्रिंक्सचा संपूर्ण ट्रे माझ्या अंगावर सांडला आणि मी भिजले. तेव्हा विमानात दुसरी सीटही रिकामी नव्हती. त्या क्षणी मी अस्वस्थ झाले आणि मला राग आला होता. पण, तेव्हा मला माझ्या आईचे शब्द आठवले. ती म्हणाली होती की नेहमी लक्षात ठेव की अनावधानाने झालेली चूक ही चूक नसते. मी शांत झाले, त्यानंतर त्या एअरहोस्टेसने संपूर्ण प्रवासात फ्लाइट विआनाला येईपर्यंत मला कंम्फर्टेबल करण्यासाठी प्रयत्न केले. ती मला १० हजार वेळा तरी सॉरी बोलली असेल. तिने दाखवलेल्या दयाळूपणा आणि काळजी याची मी आभारी आहे”, असं तिने म्हटलं आहे. Celina Jaitley |
View this post on Instagram
“जेव्हा विमानाचा अपघात होतो, तेव्हा बिसनेस, इकॉनॉमी, फर्स्ट या कशातच फरक राहत नाही. त्या आकाशात आपण सगळे समान असतो, आणि सगळे प्रार्थना करत असतो. एअर इंडिया विमान अपघातानांतर मला धक्का बसला आहे. ज्यांनी प्राण गमावले, ज्यांनी आपले नातेवाईक गमावले आणि ३५ हजार फूटांवरही रोज उत्तम सेवा देणाऱ्या त्या क्रू मेंबर्ससाठी माझं हृदय तुटते,” असे म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
“मला आठवतंय की मी माझ्या जुळ्या बाळांसोबत सिंगापूर ते मुंबई असा एकटीने प्रवास करत होते. एअर इंडिया क्रूने तेव्हा मला खूप मदत केली. तसेच मी १९ वर्षांची असताना जॅमिकाहून न्यूयॉर्केद्वारा मी मुंबईला येत असताना ज्याच्यावर मी प्रेम करते अशा व्यक्तीने मला दुखावलं तेव्हा मी रडत होते. तेव्हा एअर इंडियाच्या फ्लाइट अटेंडन्टने माझा हात हातात घेऊन मला धीर दिला होता, हे मी कधीही विसरू शकत नाही. संपूर्ण जगातील क्रू मेंबर्सला मी सांगू इच्छिते की तुम्ही फक्त ट्रे किंवा बोर्डिंग पासेस होल्ड करत नाही तर तुम्ही अश्रू, मानवी भावना, सुरक्षितता प्रवाशांच्या या सगळ्या गोष्टींसाठीही जागा ठेवता. विमान अपघातात ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या आत्म्याला शांती लाभो,” असे अभिनेत्रीने पोस्ट करत लिहिले आहे. Celina Jaitley |
हेही वाचा:





