अभिनेत्री साक्षी गांधीने निसर्गाच्या सानिध्यात घेतलं घर; दाखवली सुंदर घराची झलक

Sakshi Gandhi New Home | ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री साक्षी गांधीचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. नुकतेच साक्षीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्रीने कोकणातील चिपळूण येथे घर घेतलं आहे. या नव्या घराची झलक अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दाखवली आहे.
साक्षी गांधीने “आणि घर झालं. #चिपळूण #नवीन घर गणपती बाप्पा मोरया..”असं कॅप्शन देत तिच्या नव्या घराची पहिली झलक शेअर केली आहे. साक्षीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिचं गावचं सुंदर असं घर पाहायला मिळत आहे. दारावरची आकर्षक नेमप्लेट, पांढऱ्या रंगाच्या थीममधील इंटेरिअर, नारळाची बाग आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं तिचं हे घर मन प्रसन्न करून जातं. तिच्या नव्या घरातील सजावटीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
View this post on Instagram
नव्या घराच्या दारावरच्या पाटीवर सर्व कुटुंबीयांची नावं लावली आहेत. “श्री. महेश सौ. शर्मिला साक्षी क्षितिजा गांधी” असं या नेमप्लेटवर लिहिण्यात आलं आहे. साक्षीचं नवं घर पाहताच सिनेविश्वातील तिच्या मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. Sakshi Gandhi New Home |
साक्षी गांधीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘नवी जन्मेन मी’ या मालिकांमध्ये तिने उत्तम काम केले आहे. सध्या ती ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या मालिकेत ती यमुना धर्माधिकारी नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. Sakshi Gandhi New Home |
हेही वाचा:





