मुंबई – अभिनेत्री ऋचा चढ्ढा नेहमीच सोशल मीडियावर तिच्या बेधडक विधानांनमुळे चर्चेत असते. चित्रपटातील तिच्या हटके अभिनयामुळे तिने आपल्या चाहत्यांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. अलीकडेच “शकीला’ तेच “मॅडम चीफ मिनिस्टर’ या सिनेमातील तिच्या भूमिकेमुळे ती चांगलीच चर्चेत होती.
यातच ऋचा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतंच ऋचाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटोशूट शेअर केले असून, या फोटोतून ऋचाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. अभिनेत्री आपल्या या बोल्ड अँड बिनधास्त लुकने सर्वांनाच घायाळ करत आहे.
रिचा या बोल्ड फोटोशूटमध्ये काळ्या कटआउट गाऊनमध्ये दिसत आहे. तिच्यात झालेला हा बदल पाहून चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे. या फोटोंवर चाहत्यांसह सेलेब्सकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे. तिचे हे आउटफिट नेहमी पेक्षा जरा हटके आहे. या फोटोत ती खूप ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल्यास ती लवकरच ‘फुकरे 3’ मध्ये दिसणार आहे.