अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे छोट्या पडद्यावर कमबॅक; ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई – अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी अभिनय क्षेत्रात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 90 च्या दशकामध्ये त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांनी मालिकांमध्येही काम केले आहे. मात्र आता त्या सात वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहेत. ‘सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची’ या मालिकेद्वारे त्या आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या मालिकेतून सिंधुताई यांचं बालपण दाखवण्यात येणार आहे. प्रिया बेर्डे या सिंधुताईंच्या आजी म्हणजेच पार्वती साठे या भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेत्री अनन्या टेकवडे चिंधीची भूमिका साकारणार आहे. तर छोट्या पडदा गाजवणारा किरण माने या मालिकेत अभिमान साठे म्हणजेच चिंधीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर चिंधीची आई म्हणजेच हिरु साठेच्या भूमिकेत अभिनेत्री योगिनी चौक दिसणार आहे. पुन्हा एकदा प्रिया बेर्डे यांना पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहे.
View this post on Instagram
‘सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची’ ही मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत सिंधुताई सपकाळ यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. ‘संघर्षाचं बाळकडू होतं जिच्या ठायी, अशी चिंधी बनली लाखो अनाथांची आई…’ असं लिहीत या मालिकेचा प्रोमो आऊट करण्यात आला आहे. ही मालिका संध्याकाळी सात वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दरम्यान, प्रिया बेर्डे या अभिनयासह राजकरणात देखील सक्रिय आहे. सध्या त्या भाजप पक्षात आहे. यापूर्वी त्या राष्ट्रवादीमध्ये होत्या.





