Parineeti Chopra | बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि तिचा पती राघव चड्डा लवकरच आई-बाबा होणार आहेत. यातच आता परिणीतीबाबत लेटेस्ट अपडेट समोर आली आहे. ती रुग्णालयात दाखल झाली आहे. राघव चड्डा देखील तिच्यासोबत आहे. अभिनेत्री कोणत्याही क्षणी गुड न्यूज देऊ शकते, असे म्हंटले जात आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी परिणीती आणि राघवसाठी दुप्पट आनंद घेऊन येणारी आहे. परिणीती चोप्राने २५ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत ही आनंदाची बातमी दिली होती. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने एका केकचा फोटो शेअर केला होता. यामध्ये लिहिलं होतं, 1+1=3 आणि खाली लहान बाळाच्या पायाचे ठसे होते. प्रेग्नेंट असतानाही परिणीती सोशल मीडियावर सक्रीय होती. ती आपल्या आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करीत होती. त्याआधी कपिल शर्माच्या शोमध्ये राघव यांनी आई-बाबा होणार असल्याबाबत हिंट दिली होती. त्यांनी सांगितले होते की ते लवकरच गुड न्यूज ऐकवतील. Parineeti Chopra | परिणीती आणि राघव चड्डा यांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०२३ मध्ये लग्न केलं. राजस्थानच्या उदयपूरमध्ये त्यांचा लग्नसोहळा झाला. आता लग्नाच्या दोन वर्षांनंतर परिणीती आणि राघव नव्या पाहुण्याचे स्वागत करणार आहे. Parineeti Chopra | हेही वाचा : ‘No Kings’ निदर्शनाला डोनाल्ड ट्रम्प यांचे सडेतोड उत्तर ; AI व्हिडिओ केला जारी