अभिनेत्री निशिगंधा वाड रुग्णालयात दाखल; शूटिंगदरम्यान झाला अपघात

Nishigandha wad | मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा शूटिंगदरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘सुमन इंदोरी’ या मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरू असताना जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीन करताना निशिगंधा घसरल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. शूटिंगदरम्यान घडलेल्या या घटनेने कलाकार आणि क्रूला ही धक्का बसला आहे.
अभिनेत्रीला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सेटवरील सर्वांच्या सुरक्षेचा विचार करून काही दिवस शूटिंग थांबवण्यात आले आहे.
प्रॉडक्शन टीमच्या एक स्रोताकडून मिळालेल्या माहितीनुसार, “हा एक अनपेक्षित अपघात होता. निशिगंधा मॅडम धोक्याबाहेर असल्याचा आम्हाला दिलासा मिळाला आहे. त्या एक फायटर आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत.” याशिवाय प्रॉडक्शन टीमने भविष्यात होणाऱ्या घटना टाळण्यासाठी सर्व आवश्यक सुरक्षा प्रोटोकॉलचे पुनरावलोकन आणि अंमलबजावणी केली जाईल, असे चाहत्यांना आश्वासन दिले आहे.
दरम्यान, ‘सुमन इंदोरी’ या मालिकेच्या शुटींग दरम्यान हा अपघात झाला आहे. या मालिकेत निशिगंधा वाड सुमित्रा मित्तल नावाची भूमिका साकारत आहेत. सुमन इंदोरी हा फॅमिली ड्रामा आहे.
निशिगंधा वाड मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा आहे. 1990 च्या दशकात त्या मराठी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध झाल्या. घर संसार, शेजारी शेजारी, वाजवा रे वाजवा, बाळा जो जो रे, प्रेमांकूर, माणूस, नवरा माझ्या मुठीत गं यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांनी ससुराल सिमर का, मेरी गुडिया, कभी कभी इत्तेफाक से आणि रब से है दुआ यांसारख्या लोकप्रिय हिंदी शोमध्ये आपला ठसा उमटवला.
हेही वाचा :
अमित शाह यांच्या चारही नियोजित सभा रद्द; नागपूरहून अचानक दिल्लीला रवाना…





