अभिनेत्री नेहा पेंडसेचा ग्लॅमरस लुक; पांढऱ्या गाऊनमधील शेअर केले PHOTO

Neha Pendse Photoshoot | अभिनेत्री नेहा पेंडसेने मालिकासह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आपल्या अभिनय आणि डान्स शैलीच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेमुळे नेहाला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. नेहा पेंडसे बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते. आता तिने बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये नेहा पेंडसेने ऑफ शोल्डर व्हाइट रंगाचा वन पीस घातला आहे. यात तिने केस मोकळे सोडले आहेत आणि कानात गोल्डन रिंगचे इअररिंग्स घातले आहेत. नेहा पेंडसे या फोटोत खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांसह कलाकारांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. Neha Pendse Photoshoot |
View this post on Instagram
नेहा पेंडसेने वयाच्या १० व्या वर्षी बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने १९९५ मध्ये एकता कपूरच्या ‘कॅप्टन हाऊस’ या टीव्ही शोमध्ये काम केले होते. नेहाने हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
१९९९ मध्ये ‘प्यार कोई खेल नहीं’ या हिंदी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘मे आय कम इन मॅडम?’ आणि ‘भाभीजी घर पर है!’ या हिंदी मालिकांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. नेहा ‘बिग बॉस १२’ ची स्पर्धक देखील होती. नेहाने २०२० मध्ये शार्दुल ब्यास या उद्योगपतीसोबत लग्न केले. Neha Pendse Photoshoot |
नेहा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. ती नेहमीची आपले हॉट अँड ग्लॅमर्स फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत अनेकांचे लक्ष वेधून घेते. Neha Pendse Photoshoot |
हेही वाचा:
मॅक्रॉन यांच्याकडून फ्रान्सच्या नव्या पंतप्रधानाची निवड ; जाणून घ्या कोण आहेत सेबास्टियन लेकोर्नू ?





